प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यावतीने सम्राट अशोक चौक येथे शिवसेनेच्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर व शहरप्रमुख प्रकाश राऊत यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी प्रकाश हेब्बाजी, बाळकृष्ण चव्हाण-पाटील, दीपक निपाणीकर, बाबू नावगेकर, बाळू काकडे, मंजुनाथ हिरेमठ, कृष्णा नाईक यासह इतर उपस्थित होते.









