Kolhapur News : गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेने कोल्हापूर सांगली राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन के.ले यावेळी अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य झालेल्या क्षेत्रात किंवा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी शिवसेना गटाकडून करण्यात आली. मागणी मान्य करा अन्यथा राज्यभरात उग्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याला राज्य सरकार जबाबदार राहील असा इशाराही शिवसेना गटाकडून देण्यात आला.
काय आहेत प्रमुख मागण्या
-शेतकऱ्यांना दर हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी
-शेतमजूर कुटुंबाला पंचवीस किलो मोफत धान्य आणि नुकसान काळातील प्रतिदिन तीनशे रुपये अनुदान द्यावे
-बाधित क्षेत्रातील नुकसान झालेल्या घरांसाठी तात्पुरती प्रत्येकी 25 हजार रुपये मदत करावी
-नियम आणि अटी न लावता ओला दुष्काळ जाहीर करावा
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









