शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्यावर पोलिस गुन्हा दाखल करा आणि मला न्याय द्या, अन्यथा सर्वांसमोर आय़ुष्य संपवणार असा इशारा पिडीत महिलेने दिला आहे. तिने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे. तसेच ट्विटरवर दोन व्हिडिओही पोस्ट केले आहेत. एका महिलेने राहुल शेवाळेंवर फसवणुकीचा आरोप केला आहे. यामुळे राहुल शेवाळेंच्या अडचणीत भर पडणार आहे.
याच महिलेकडून साकीनाका पोलिस स्टेनमध्ये शेवाळे (Rahul Shewale) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र शेवाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र याच महिले विरोधात खंडणीचा गुन्हा शेवाळेंनी दाखल केला. यानंतर त्या महिलेने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शेवाळेंनी अत्याचार केल्याचा आरोप तिने करत न्यायाची मागणी केली आहे. आतापर्यंत जे काही झाले आहे ते सविस्तर तिने पत्रात म्हटलं आहे. यासोबतचं तिनं दोन व्हिडिओ पोस्ट केले आहेत. या पत्रानंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेतील हे पाहावं लागणार आहे.
हेही वाचा- खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात
काय म्हटलं आहे पत्रात
शेवाळे यांचे लग्न झाले असल्याची कल्पना होती. मात्र शेवाळे यांचा पत्नीसोबत सतत वाद होत असून लवकरच तिच्यापासून घटस्फोट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यावर विश्वास ठेवला असे या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. याचबरोबर त्यांनी अत्याचार केल्याचं नमूद केलं आहे. तसेच मला न्याय द्या, अन्यथा सर्वांसमोर आय़ुष्य संपवणार असा इशारा दिला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








