Shiv Sena MLA Disqualification Case : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाकडून दिला जाण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तसेच संकेत बुधवारी दिलेतं. या निर्णयावर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भवितव्य निर्धारित होणार आहे. आम्ही गुरुवारी दोन निर्णय घोषित करणार आहोत अशा शब्दांमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हा संकेत दिलायं. मात्र कोणत्या प्रकारांमध्ये हे निर्णय दिले जाणार आहेत याची स्पष्ट माहितीदेण्यात आलेले नाही.
महाराष्ट्रातील या सत्ता संघर्षाचा प्रारंभ 20 जून 2022 पासून झाला आहे. शिवसेनेतील 40 आमदार विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गेल्याने उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले होते. नंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. परिणामी, राज्यपालांनी शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. त्यांनी बहुमत सिद्ध केल्याने आजही त्यांचे सरकार महाराष्ट्र सत्तेत आहे.
सर्वोच्च न्यायालयात याचिका
उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रेसंबंधी याचिका सादर केली. या आमदाराने पक्षांतरविरोधी कायद्याचा भंग केल्याने ते सभागृहाचे सदस्य राहू शकत नाहीत, असे याचिकेत प्रतिपादन करण्यात आले आहे. या मुख्य याचिकेशिवाय अन्य याटिकाही आहेत. तत्कालीन राज्यपालांनी त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग करून उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याची सूचना केल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








