Shiv Sena Minority Cell Vengurla Taluka Pramukh Padi Rafiq Beg
शिवसेना अल्पसंख्यांक सेल वेंगुर्ला तालुकाप्रमुख पदी रेडीतील रफिक बेग यांची नियुक्ती पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत साहेब, जिल्हासंपर्क प्रमुख अरुण दूधवाडकर यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गावातील कट्टर शिवसैनिक याकूब उर्फ रफिक बेग यांची अल्पसंख्यांक वेंगुर्ला तालुका प्रमुख पदी निवड झाली.
शिवसेना अल्पसंख्यांक सेलचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अब्दुल मज्जीद अब्बास बटवाले यांच्या सहीचे पत्र आज वेंगुर्ला येथे शिवसेनेची मासिक सभे चे औचित्य साधून वितरित करण्यात आले
यावेळी सावंतवाडी मतदार संघ प्रमुख शैलेश परब, उपजिल्हा प्रमुख अजित सावंत, तालुका प्रमुख बाळू परब, महिला तालुकाप्रमुख सुकन्या नरसुले, संदेश निकम, युवासेना तालुका प्रमुख पंकज शिरसाट रेडी उपसरपंच नामदेव राणे, रेडी ग्रा. पं सदस्य श्रीकांत राऊळ, विभाग प्रमुख काशिनाथ नार्वेकर, रश्मी डिचोलकर विनोद राणे प्रसाद रेडकर तसेच वेंगुर्ला तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.
रेडी (प्रतिनिधी)









