अतिवृष्टीत उत्तम प्रकारे व्यवस्थापन केल्याबद्दल केले अभिंनदन
सावंतवाडी प्रतिनिधी
शिवसेना महीला आघाडी तर्फे सावंतवाडी तहसिलदार कार्यालयात तहसिलदार श्रीधर पाटील यांची भेट घेवून त्यांनी सावंतवाडी तालुक्यात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत शासनाने आपत्कालीन व्यवस्थापन उत्तम व योग्य प्रकारे बजावले त्याकरिता आज शिवसेना महिला आघाङी तर्फ त्यांचे शाल श्रीफळ देवुन गौरव करण्यात आला . व असेच चांगले कार्य त्यांच्याकडून व्हावे अशी सदिच्छा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक अँड निता सावंत कविटकर यांनी व्यक्त केली.
यावेळी उपजिल्हा संघटक सौ . अर्चना पांगम, व सौ उर्त्कषा गावकर तसेच उपशहरप्रमुख सौ नीलिमा चेलवाडी , शाखासंघटक सौ सिमा सोनटक्के, प्रभाग संघटक सौ . पूजा नाईक, बुथ संघटक सौ. भारती परब, तसेच निरवडे शाखासंघटक सौ. चैञाली गावडे व उमिॅला उरणकर, साधना मोरे,कांचन जाधव, अनीता शिंदे या सर्व महिला पदाधिकाऱी उपस्थित होत्या.









