शिवसेना नेते आदित्य ठाकरे ( Aditya Thakre ) बिहारमध्ये दाखल झाले असून त्यांनी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव ( Tejswi Yadav ) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटी दरम्यान दोन युवा नेत्यामध्ये चर्चाही झाली. आदित्य ठाकरे यांचे बिहारमधील पाटणा निमानतळावरील ( Patna Airport ) आगमनापसून ते उपमपख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या भेटीपर्यंतचे फोटो पहा..

युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे ऱाष्ट्रिय जनता दलाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री यशस्वी यादव यांची भेट घेण्यासाठी पाटणा विमानतळावर पोहोचले असून विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.


पहिल्यांदाच पाटण्यात आलेले आदित्य ठाकरे यांच्या आदित्य ठाकरेंच्या या भेटीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.देशातील दोन युवा नेत्यांची भेट विशेष मानली जात असून उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेण्यासाठी आदित्य ठाकरे पाटण्यात पोहोचले आहेत.

बिहारमधील राजकीय बदल आणि महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सातत्याने राजकीय उलथापालथ होत आहे. देशातील अनेक बडे नेते सातत्याने बिहार दौऱ्यावर येत आहेत.

शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे बुधवारी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेण्यासाठी पाटणा येथे पोहोचले आहेत. राजकीय जाणकारांच्या मते राष्ट्रीय राजकारणात विरोधी ऐक्याच्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी.








