शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अनिल परुळेकर यांचे निधन
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्ती असलेलेअसलेले येथील माठेवाडातील अनिल हरी परुळेकर वय( 84 )यांचे गुरुवारी रात्री साडेआठ वाजता निधन झाले .परुळेकर क्लिनिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात मुलगी, दोन बहिणी,जावई नातवंडे ,पुतणे असा परिवार आहे .
अनिल हरी परुळेकर जन्म 30 एप्रिल1939 मालवण येथे झाल प्राथमिक शिक्षण चितारआळी येथील शाळा नंबर एक मध्ये पूर्ण केलं तर सावंतवाडी कळसुलकर हायस्कूल येथे 1955 ला एसएससी परीक्षा पास झाले आणि त्यानंतर 1955 सालापासून संयुक्त मार्गाचा लढा लढताना मुंबई युनिव्हर्सिटी चे जनरल सेक्रेटरी म्हणून काम पाहिले. त्यावेळी प्रबोधनकार केशवराव ठाकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. 1962 मध्ये VJTI मध्ये मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअर ही पदवी मिळवली आणि 1962 आणि कोईमतुर मध्ये इंजिनियर म्हणून नोकरी केली. 1985 मध्ये ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख होते बाळासाहेब ठाकरे यांचे ते कडवट शिवसैनिक होते . शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी आपल्याप जिवाचे रान केले होते खुद्द बाळासाहेब ठाकरे माठेवाडा येथे त्यांच्या राहत्या घरी तीन दिवस वास्तव्यासाठी होते.सावंतवाडी कळसुलकर शाळेमध्ये विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली त्यामध्ये सुद्धा ते एक हिस्सा बनले. 1988 मध्ये माजी विद्यार्थी व लोक वर्गणी मधून 30 लाख रुपये जमा करून कळसुलकर शाळेची तीन मधली इमारत उभी केली.आपल्या मराठी माणसांना सेवा मिळावी म्हणून सावंतवाडी मध्ये आलो आणि समाजसेवा करण्याचा एक नवा मार्ग सामाजिक बांधिलकी संघटना यांच्या माध्यमातून मिळाला. आणि वयाच्या 85 वर्षानंतर सुद्धा एक सामाजिक बांधिलकी संघटने मध्ये काम करण्याची संधी मिळाली. प्राध्यापिका पद्मा फातर्फेकर यांचे ते भाऊ होत तर डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांचे ते काका होत शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख वसंत उर्फ अण्णा केसरकर तसेच माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी परुळेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या निधनाने निष्ठावंत शिवसैनिक आणि मार्गदर्शक हरपल्याचे केसरकर साळगावकर यांनी सांगितले.
सावंतवाडी / प्रतिनिधी