इस्लामपूर: शिंदे गटात प्रवेश करत नाही म्हणून शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रतिभा शिंदे यांचे पती शिवकुमार दिनकर शिंदे (वय ४९) यांच्यावर शिवसेनेचे तालुका प्रमुख सागर मलगुंडेसह सहा अनोळखींनी रॉडने खुनी हल्ला केला.’ ही घटना सोमवारी (ता.२६) सकाळी आठच्या सुमारास हनुमाननगर रस्त्यावर घडली. यामध्ये शिवकुमार शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सांगली येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
शिंदे हे सकाळी आठच्या सुमारास रेणुका दूध डेअरीमधून मोटारसायकलवरुन दूध घेऊन घरी जात होते. मंत्री कॉलनी येथे डॉ. शिंदे यांच्या घरासमोर लाईटच्या पोलचे काम सुरु असल्याने पोलला शिडी लावली होती. त्या शिडीजवळ तीन व्यक्ती उभ्या होत्या. एक व्यक्ती शिडीवर होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर मास्क होते. त्यातील एकाने शिंदे यांना वर काम सुरु आहे, जरा थांबा असे सांगितले. त्यावेळी शिंदे यांनी मोटारसायकल थांबवली. त्यापैकी एकाने शिंदे यांच्या उजव्या हातावर रॉडने जोरात मारल्याने शिंदे खाली पडले. मागून तिघांपैकी एकाने शिंदे यांच्या पाठीत रॉडने हल्ला केला.
हेही वाचा- अखेर बेपत्ता मनोज गडकरीचा मृतदेह सापडला
दरम्यान, शिंदे हे मोटारसायकल तिथेच सोडून पळून जाऊ लागले. त्या सात जणांनी शिंदे यांचा पाठलाग केला व शिंदे यांना मारहाण केली. त्यातील एकाने रॉड उजव्या पायावर मारला व आता मस्ती जिरली का? अशी धमकी दिली. यावरुन हा व्यक्ती सागर मलगुंडे असल्याचे शिंदे यांनी ओळखले. दुसऱ्या एकाने त्यांच्या डाव्या पायाच्या नडगीवर रॉडने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली. रॉडने मारहाण झाल्याने शिंदे यांना हालचाल करता आली नाही. दरम्यान हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी शिंदे यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे.
Previous Articleयेळ्ळूर येथील धरणात म्हशीचा बुडून मृत्यू
Next Article आरक्षण सोडतीसाठी स्थळ, वेळ निश्चित









