शिंदे-भाजप सरकारचा आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे. शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी होणार आहे. शिंदे गट आणि सेनेच्या ४ याचिकांवर सुनावणी होणार आहे. साधारणता ११ वाजता ही सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आजच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिले आहे. सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे.
यामध्ये मविआच्या प्रयोगावर मतदार नाराज असल्याचा शिंदेंचा दावा खोटा असल्याचे म्हटलं आहे. तसेच शिंदे गटाच्या प्रतोद, गटनेते मान्यतेविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. अडीच वर्षात एकनाथ शिंदेंनी आक्षेप का नोंदवला नाही? असा सवालही विचारला आहे. शिंदे फडणवीसांच्या शपथविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
कोणत्या याचिकांवर सुनावणी
शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेविरोधात याचिका.
-शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी, प्रतोद सुनील प्रभुंच्या नियुक्तीला आव्हान.
-प्रतोद भरत गोगावलेंच्या व्हीपचं सेना आमदारांच्या उल्लंघनाविरोधात आव्हान.
-शिंदेंचा शपथविधीला राज्यपालांनी बोलावलेल्या विशेष अधिवेशनाविरोधीत याचिका.
शिवसेनेचं कोर्टात प्रतिज्ञापत्र
शिवसेना, NCP,काॅंग्रेसच्या आघाडीवर लोक नाराज ही खोटी कहाणी रचली.
-ठाकरे सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात शिंदेंनी आक्षेप का घेतला नाही
-भाजपनं सेनेला समान दर्जा दिला नाही, मविआत सेनेचा मुख्यमंत्री झाला
-अडीच वर्षाच्या काळात शिंदे गटातील आमदारांनी सत्तेचा फायदा घेतला.
-लोक नाराज होते मग शिंदे गटाचे ामदार सरकारमध्ये सामील का झाले होते?
-स्वत:च्या पक्षाचं म्हणजे शिवसेनेचं सरकार एकनाथ शिंदे गटानं पाडलं.
-शिवेसेना फोडून शिंदेंनी वेगळा गट स्थापन केला पक्षप्रमुखांविरोधातही कृती केल्या.
-शिंदे गटानं मविआ सरकार पाडून भाजपसोबत सरकार स्थापनं केलं. शिंदे गट दोषी ठरतो.
-मविआच्या प्रयोगावर मतदार नाकाज असल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा खोटा
Previous Articleइको ट्रेक्सतर्फे रायगड, प्रतापगड पदभ्रमण मोहीम
Next Article हरमल येथील भजनी सप्ताह आजपासून








