सावंतवाडी प्रतिनिधी
शेर्ले कापईवाडी ते कास -निगुडे रस्ता मंजूर असून या रस्त्याबाबत अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे गावच्या सरपंचांसह ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम कार्यासमोर 15 ऑगस्ट रोजी उपोषण छेडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या संदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सरपंच सौ प्रांजल जाधव व त्यांच्या शिष्टमंडळाला सदर रस्त्याचे काम लवकरच मार्गी लावले जाईल असे आश्वासन दिल्यानंतर उद्या 15 ऑगस्ट रोजी होणारे उपोषण स्थगित करण्यात आले आहे .हा रस्ता लवकरच होणार याची खात्री श्री परब यांनी दिल्यामुळे ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले .यावेळी मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष गुंडू जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे , तालुकाप्रमुख गजानन नाटेकर, मंगलदास देसाई ,कोलगाव विभाग प्रमुख महेश सावंत, प्रशांत जाधव शशिकांत गावडे ,सदा कदम, अभय राणे आधी उपस्थित होते









