वार्ताहर/ पुसेगाव
एकनिष्ठ असलेल्या ठाकरे गटाचे सातारा शिवसेना जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी आ महेश शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला
रस्त्यावर उतरून जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलने करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता ते शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पदापर्यंत प्रताप जाधव यांनी मजल मारली.खेडोपाडय़ातून पुसेगावात शिक्षणासाठी येणाया गोरगरीब मुलींना अभय त्यांच्यामुळेच मिळाले.नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न, विविध समस्या यासाठी रास्ता रोको, शेतकरी व सामान्य माणसाच्यासाठी वीज वितरण कंपनी विरोधात केलेल्या आंदोलनात प्रताप जाधव यांचा हिरारीने सहभाग असल्याने जनतेने त्यांना बळ दिले,
खटाव तालुक्यातील जिहे कटापूर योजना कार्यान्वित होण्यात त्यांचाच मोठा वाटा आहे.श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त म्हणून ही त्यांनी उत्तम काम केले.
मात्र गेल्या काही दिवसांपासून मनात खदखदत असलेल्या भावनेने अखेर पेट घेतलाच! जिल्हा शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस याला कारणीभूत ठरली,आणि खटाव तालुक्याचे आ महेश शिंदे यांच्या माध्यमातून मंगळवारी रात्री मंत्रालयात मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्या सेनेत दाखल झाले आहेत.








