Uddhhav Thackeray In Mahad: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा रायगडमधील महाड येथे पार पडत आहे.महाडमध्ये दाखल होण्यापूर्वी उद्धव यांनी बारसू येथील ग्रामस्थांची भेट घेतली.यावेळी त्यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.बारसू प्रकल्पामुळे कातळशिल्पे धोक्यात आली आहेत. कातळशिल्पे वाचवण्यासाठी युनेस्कोला पत्र लिहणार असल्याचं त्यांनी आज सांगितलं. तसेच बारसू आंदोलनाला शिवसेनेची पूर्ण ताकद असून स्थानिकांच्या आम्ही पाठिशी आहोत. लोकांच्या हिताचा प्रकल्प असेल तर स्वागत करू असेही उध्दव ठाकरे म्हणाले.
दरम्यान,कोकणात बारसू रिफायनरीवरून रणकंदन सुरु असतानाच आज (6 मे) दोन ठाकरे बंधू कोकण भूमीमध्ये आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाडमध्ये आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज रत्नागिरीत आहेत. उद्धव ठाकरे यांची महाडमध्ये सभा होत असून राज ठाकरे यांची सभा रत्नागिरीत होत आहे. त्यामुळे या दोन्ही सभांकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








