२०२२ पासून प्रतीक्षा लागून राहिललेला शिवसेना कोणाची ? हा निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. हा निकाल देत असताना त्यांनी असं म्हंटल आहे की, एकनाथ शिंदे यांनी कोणतीही पक्ष विरोधी कारवाई केलेली नाही.केवळ पक्षाने बोलविलेल्या बैठकीला गैरहजर राहिले म्हणून त्यांना व १६ आमदारांना अपात्र करता येणार नाही. आणि तसेच शिंदे गटाने दिलेली १९९९ ची घटना म्हणजेच शिवसेना आहे. आज हा निकाल आल्या नंतर शिवसैनिकांनी दसरा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीजवळ फटाके फोडून साखरपेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ अशा घोषणा सर्व शिवसैनिकांनी दिल्या तसेच इथून पुढची वाटचाल धर्मवीर आनंद दिघे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारा नुसार करणार असल्याचे उपस्थित शिवसैनिकांनी सांगितले.
Previous Articleपाणी गुणवत्तेची वर्षातून दोन वेळा तपासणी करा; जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या सूचना
Next Article प्राध्यापकाचा हात कापणाऱ्या मुख्य आरोपीला अटक









