बेळगाव : गणेशपूर येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आज 57 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन सचिन गोरले यांनी केले.
यावेळी विनायक हुलजी, पल्लारी पावशे, वैभव कामत, जय पावशे, राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, तानाजी पावशे, उमेश चौगुले, राजू कनेरी, भरमा सावगावकर, प्रदीप सुतार आदी उपस्थित होते.









