जयसिंगपुरात शिवसेना आणि यड्रावकर समर्थक आमने-सामने आले आहेत. मोठा जनसमुदाय एकत्र आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहावा यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र सध्या कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यड्रावरकरांच्या बाबतीत चुकीची भुमिका घेतली तर खपवून घेतली जाणार नाही अशा इशारा यड्रावकर समर्थकांनी दिला आहे. मात्र शिवसैनिक आक्रमक होत यड्रावकरांचा बोर्ड फोडला आहे. सध्या जयसिंगपुरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसैनिकांकडून यड्रावकर यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. तर दोन्ही गट आमने-सामने आल्यामुळे प्रचंड झटापट सुरु आहे. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांच्या मध्ये झटापट झाली. दरम्यान पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना सध्या पांगवले आहे.
शिवसैनिक आणि पोलीस यांच्यात झालेल्या झटापटीत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना जयसिंगपूर मधील संजीवनी रुग्णालयात दाखल केले आहे.
शिवसेनेच्या गोटातून मंत्रिपद घेणारे राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे. यड्रावकर हे गद्दार आहेत. त्यांनी रत्नाप्पा आण्णा कुंभार यांच्यासोबतही गद्दारी केली होती. म्हणूनच आम्ही बंडखोरी करत शक्तिप्रदर्शन करत आहोत. यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 500 कोटी विकासाचा निधी दिला आहे. मात्र यांनी निधी दिला नाही असं सांगितलं. तुम्ही परत या आणि मुख्यमंत्र्यांना साथ द्या असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रुमखांनी केले. यावेळी आक्रोश व्यक्त करत ते म्हणाले , तुम्हाला शिवसैनिकांचा तळतळाट लागणार आहे. तुमचा सत्यनाश झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही बाळासाहेबांना मानणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही या विरोधात आंदोलन करणाच असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Previous Articleडोडात चिनी शस्त्रासह दहशतवादी अटकेत
Next Article शिंदे गटाने पाठिंबा काढला; ठाकरे सरकार अल्पमतात
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.