Vinayak Mete Death : शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचा आज पहाटे अपघाती मृत्यू झाला. मेटेंच्यावर उद्या संध्याकाळी चार वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. मेटेंचे पार्थिव आज एअर अॅंब्सूलन्सने बीडला नेण्यात येणार असल्याची माहिती शिवसंग्रामचे प्रवक्ते प्रफुल्ल पवार यांनी सांगितली.
मेटेंचे अंगरक्षक राम डोगळे हे देखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांच्या जिवितास धोका नसल्याचे डाॅक्टरांनी सांगितले आहे. मात्र पुढचे काही तास प्रकृतीच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे हि सांगितले.
दुसरीकडे मेटेंचे चालक एकनाथ कदम यांचा जबाब पोलीस नोंदवणार आहेत. एकनाथ कदम यांची रसायनी पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. चालकाकडून अपघाताचा तपशील पडताळून पाहणार आहे.
विनायक मेटेंच्या मृत्यूने मोठा धक्का बसल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून येत आहे. मेटेंच्या अकाली जाण्याने राज्यभरातून शोक व्यक्त केला जात आहे. सर्वंच राजकीय पक्षातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठा आरक्षण, शिवाजी महारांचे स्मारक समुद्रात व्हावे अशा प्रमुख मागण्या त्यांच्या होत्या. मराठा आरक्षणा संदर्भात आज मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकिसाठी येत असतानाच त्य़ांचा अपघाती मृत्यू झाला.
विनायक मेटेंचा प्रवास
जन्म- ३० जून १९६३ मध्ये राजेगाव तालुका केजमध्ये जन्म झाला.
अध्यक्ष-शिवसंग्राम पक्षाचे ते अध्यक्ष होते.
सुरुवात-१९८० मध्ये मराठा महासंघातून राजकीय प्रवासास सुरुवात झाली.
आमदार-युतीच्या सरकारमध्ये आमदार म्हणून त्यांनी काम केले.
पदे- विनायक मेटे शिवस्मारक समितीचे माजी अध्यक्ष.
सलग पाचवेळा विधानपरिषद सदस्य होते.
मराठा आरक्षणाचे प्रमुख नेते होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








