वेंगुर्ले (वार्ताहर)-
Shiv Sena honors laborers in Vengurla on Labor Day!
शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या संकल्पनेतून कार्यक्रम
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी मतदार संघातील सर्वच क्षेत्रात ग्रासरूटवर काम करणाऱ्या श्रमजिवी महिला व पुरूष कामगारांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने वेंगुर्लेत शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित |केलेल्या कार्यक्रमांत महिला व पुरुष अशा सुमारे ५०० जणांना भेटवस्तुसह मिठाई वाटप करून शिवसेना पक्षातर्फे सन्मान करण्यात आला.
वेंगुर्ले भटवाडी येथील श्री सिध्दीविनायक मंगल कार्यालयात वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेला श्रमजिवी महिला-पुरुष कामगारांचा सत्कार वेंगुर्ले शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर उपस्थित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांत तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, संघटक माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे, पंचायत समितीचे माजी सभापती सुनिल मोरजकर पंचायत समितीचे माजी सदस्य समाधान बांदवलकर, तालुका प्रवक्ते सुशिल चमणकर, शिवसेनेच्या महिला आघाडी शहर प्रमुख मनाली परब, दाभोली सरपंच अनिता डिसोजा, दाभोलीचे उपसरपंच एकनाथ राऊळ, माजी सदस्य नरेश बोवलेकर, उभादांडा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गणपत केळूसकर, प्रकाश मोठे, युवासेना प्रमुख संतोष परब, संजय परब, राजू परब, महिला शहर संघटक अँड. श्रद्धा बावीस्कर, अल्पसंख्यांक सेलच्या शहर संघटक शबाना शेख, शाखा प्रमुख प्रभाकर पडते, रविना राऊळ, आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम यांनी, तळागाळातील सर्वसामान्य काजू, आंबा, शेती, नर्सरी, स्वच्छता यासह असंघटीत कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या महिला-पुरुषांचा सन्मान करण्याबाबतच्या संकल्पनेनुसार हा सन्मान केला जात आहे. नागरीकांनी एकत्रित येऊन सुचविलेली कामे आम्ही दिपक केसरकर यांच्या माध्यमातून पूर्णत्वास नेऊ असे असे स्पष्ट केले.
तर शिवसेना तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांनी, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर हे सर्वसामान्य व्यक्तींचा त्यांच्या कामांचा सन्मान करणारे आहेत. त्यांनी विकासाचे केलेले व्हीजन हे महत्वाचे आहे. वेंगुर्ले तालुक्यातील ३० गावांत श्री. केसरकर यांच्याकडून सरासरी ४ ते ५ कोटी रूपयाची विकास कामे निधी उपलब्द करून ती निधी मंजुरीने होऊ घातलेली आहेत.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे यांनी, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी वेंगुर्ले शहरात पर्यटन दृष्ट्या साकारलेल्या व साकारणाऱ्या विविध कामांची माहिती देत श्री. केसरकर करीत असलेल्या विकासास दुरदृष्टीचे व्हीजन आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम यांनी तर सुत्रसंचालक व आभाराचे काम शिवसेनेचे तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांनी मानले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला व पुरुष कामगार उपस्थित होते.









