प्रतिनिधी / बेळगाव
श्री शिवछत्रपती सेवा संघातर्फे शिवरायांची 343 वी पुण्यतिथी गांभीर्याने पाळण्यात आली. प्रेरणामंत्र म्हणून शिवरायांच्या मूर्तीचे पूजन ओम शेट्टी व साईराज शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष विनायक शेट्टी यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. याप्रसंगी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.









