गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. गडकिल्ल्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करा अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे. मंत्र्यांच्या बंगल्याला किल्लांचे नावं देता मग गड संवर्धनाची जबाबदारी का घेत नाहीत असा सवाल शिवप्रेमींनी केला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे शिवप्रेमी आणि गडप्रेमींकडून आंदोलन करण्यात येत आहे.
दरम्यान, घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी बॅरिगेट्स लावून आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक झालेले आंदोलक मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे जाण्यास ठाम आहेत.राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता तर मग तुम्हाला शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी वेगळं महामंडळ स्थापन करावेच लागेल अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









