वार्ताहर/मजगाव
सालाबादप्रमाणे मजगाव येथे प्रत्येक गल्लीत शिवजयंती साजरी करण्यात आली. मंगळवारी प्रत्येक गल्लीच्या कोपऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची स्थापना करून पूजन करण्यात आले. यावेळी देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष शिवाजी पट्टण, दीपक सातगौडा, नगरसेविका प्रिया सातगौडा व देवस्थान पंचकमिटीचे सदस्य राजवीर मजुकर, सुकुमार गौरण्णा व इतर सदस्य गल्लीतील युवक मंडळांना भेटून शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी छ. शिवाजी महाराज की जय…च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. संपूर्ण गावात भगवेमय वातावरण आहे. पारंपरिक गाडे मिरवणूक 2 मे रोजी होईल.









