बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड आणि संस्कृती खाते तसेच महानगरपालिका बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये महाराजांच्या मूर्तीला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, महानगरपालिका सदस्य, मनपा आयुक्त, कन्नड व संस्कृती खात्याच्या विद्यावती बजंत्री आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Article‘बार’च्या नूतन पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली सूत्रे
Next Article जिल्हा स्वातंत्र्यसैनिक संघातर्फे शिवजयंती
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









