वार्ताहर/धामणे
प्रतिवर्षाप्रमाणे धामणे येथील श्री शिवशक्ती युवक मंडळाच्यावतीने मंगळवार दि. 29 एप्रिल रोजी उसाहाने व भक्तीमय वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली. मंगळवारी सकाळी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन मंडळाच्यावतीने करण्यात आले. त्यानंतर महिला भक्तांनी पाळणा म्हणून महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशी घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी मंडळाचे कार्यकर्ते सागर पाटील, भरत रेमाणाचे, राजू रेमाणाचे, चांगाप्पा पाटील, सचिन पाटील, निवृत्ती रेमाणाचे आदी उपस्थित होते. याचप्रमाणे सर्व युवक मंडळांतर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली.









