Shiv Jayanti in excitement at Banda
बांदा शहर व परिसरात अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्तीस्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना जयंती उत्सवानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा करण्यासाठी अवघी बांदा नगरी भगवी झालेली पाहायला मिळाली. ‘जय भवानी,जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.कट्टा कॉर्नर ते गडगेवाडी दरम्यान डोलपथकासह भव्य रॅली काढण्यात आली.स्थानिक युवती व महिलांनी लेझीम नृत्ये सादर केली.परिसरात पारंपरिक वेशभूषेत आबालवृद्धांसह महिला व तरुण या सोहळ्यात सहभाग घेतला.
यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब,माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगांवकर, ग्रामपंचायत सदस्य शाम मांजरेकर, बाळू सावंत, मकरंद तोरसकर, राजा सावंत, बांदा पोलिस निरिक्षक शामराव काळे व शिवप्रेमी मोठ्या संख्येत उपस्थित होते. बांद्यात निमजगा वाडी, श्रमित मित्र मंडळ कट्टा कार्नर, मोर्येवाडा येथे शिवजयंती उत्सव,बांद्यात विविध मंडळांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रतिनिधी
बांदा









