वार्ताहर/सांबरा
बसवण कुडची येथे मंगळवार दि. 29 रोजी सुदर्शन युवक मंडळाच्या वतीने पारंपरिक शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला सचिन तारिहाळकर यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. सुनील दिवटे यांनी श्रीफळ वाढविले. यावेळी प्रसाद वाटण्यात आला. याप्रसंगी जोतिबा बेडका, महेश बेडका, राजु चौगुले, सुरज तारिहाळकर, सागर बेडका, पवण तारिहाळकरसह गल्लीतील नागरिक उपस्थित होते.









