मिरवणुकीत विविध मंडळांचा सहभाग : देखाव्यांनी शिवप्रेमींत उत्साह
वार्ताहर /उचगाव
उचगाव येथील सहा युवक मंडळांच्या वतीने शनिवार दि. 3 जून रोजी रात्री शिवजयंतीचे औचित साधून सुरू झालेल्या भव्य शिवजयंती चित्ररथ मिरवणूक सोहळा उत्साहात पार पडला. शनिवारी रात्री भगवा रक्षक युवक मंडळ, लक्ष्मी गल्ली उचगाव, रवळनाथ युवक मंडळ व श्रीराम सेना हिंदुस्थान, रवळनाथ गल्ली उचगाव, शिवस्मरण युवक मंडळ, अनगोळ गल्ली उचगाव, श्री युवक मंडळ, मठ गल्ली उचगाव, नागेशनगर युवक मंडळ, नागेशनगर उचगाव, संयुक्त एमजी तालीम, मारुती गल्ली उचगाव या मंडळांचा यामध्ये समावेश होता. भगवा रक्षक युवक मंडळ लक्ष्मी गल्ली उचगाव यांच्या या भव्य शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीमध्ये ‘पावनखिंडचा रणसंग्राम’ या देखाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्ररथ मिरवणुकीचा शुभारंभ बेळगाव तालुका श्रीराम सेनेचे अध्यक्ष भरत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन सुधीर बिरजे व ज्योतिबा उंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. तर ग्रा.पं. उपाध्यक्षा मथुरा बाळकृष्ण तेरसे व सदस्या योगिता बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते चित्ररथ मिरवणुकीचे पूजन करण्यात आले. यावेळी अमर जाधव, विनोद कोळी, विनायक चौगुले, सुमित लाळगे, प्रफुल्ल चौगुले, विक्रम गडकरी, राकेश बांदिवडेकर, सचिन कदम, सिद्राय लाळगे यासह मान्यवर मंडळी उपस्थित होती. स्वागत नेहाल जाधव, निखिल जाधव व परशराम जाधव यांनी केले. सूत्रसंचालन एन. ओ. चौगुले यांनी केले. रवळनाथ युवक मंडळ व श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शिवजयंती चरित्र मिरवणूक देखावा सादर करण्यात आला. लक्ष्मणराव होनगेकर, योगिता देसाई, राकेश बांदिवडेकर, बळवंत देसाई, महाबळेश्वर देसाई, विनायक चौगुले, विनायक कोळी, मुराद ताशीलदार, बाबुराव यादव, अमर जाधव, अरुण जाधव, मनोहर होणगेकर, सदानंद देसाई, चंद्रकांत देसाई, मोनापा पाटील, दिलीप कोंडस्कोप, अशोक जाधव, ओंकार पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत डॉल्बी पूजन, देखावा उद्घाटन करण्यात आले. भगवा रक्षक युवक मंडळाच्या वतीने खास शिवकालीन युद्धकला, शिवचरित्रावर आधारित भव्य देखावा सादर करण्यात आले होते. चित्ररथ मिरवणूक रात्री आठ वाजता प्रारंभ करण्यात आली. गावातील प्रमुख मार्गावरून ही चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली.









