वार्ताहर /कंग्राळी खुर्द
परिसरामध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त गावात ठिकठिकाणी भगवे ध्वज, भगव्या पताका आणि ध्वनिक्षेपकावर छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या शौर्याचे पोवाडे यामुळे संपूर्ण परिसर भगवेमय झाले होते.
शिवाजी चौक
कंग्राळी खुर्द येथील शिवाजी चौकामध्ये शिवप्रतिष्ठानच्यावतीने सकाळी नित्यपुजेवेळी दुग्धाभिषेक, जलाभिषेक करून मुर्तीला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. त्यानंतर शिवप्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आर. आय. पाटील आणि केदारी पाटील यांनी श्रीमूर्तीला पुष्पहार अर्पण केला तर अॅड. एम. जी. पाटील यांनी श्रीफळ वाढविला. प्रगती मंडळाचे श्रीकांत पाटील यांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला. यावेळी रुक्मिणी निलजकर, सरस्वती पाटील, जयश्री बाळेकुंद्री, मोहिनी पाटील यांनी पाळणा म्हटला. प्रेरणामंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिवरायांची आरती, गजाननाची आरती, ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी शिवप्रतिष्ठानचे मनोहर पाटील, गजानन पाटील, सागर पाटील, बी. डी. मोहनगेकर, बी. एन. पुजारी, बाळ बसरीकट्टी यांच्यासह शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महादेव रोड
य् ाsथील शिवप्रेमी युवकांनी यावर्षी सिंहासनावर आरुढ छत्रपती शिवरायांची मूर्ती नव्याने आणली. शुक्रवारी सायंकाळी श्रीमूर्तीची पहिल्या बसस्थानकापासून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी विठ्ठल-रखुमाई महिला भजनी मंडळाने भजन वाद्यासह शोभायात्रेमध्ये सहभाग दर्शवला. शिवाजी चौकात शोभायात्रा येताच अश्वारुढ शिवमूर्तीला जवान राकेश पाटील, बबलू गिऱ्ह्याळकर यांनी मालार्पण करून पूजन केले. ग्रा. पं. सदस्य भैय्या पाटील यांनी श्रीफळ वाढविला. त्यानंतर शिवमूर्ती शोभायात्रा समारंभस्थळी आगमन झाले. यावेळी रेखा पाटील आणि महादेव पाटील यांनी शिवप्रेमी नागरिकांना अल्पोपाहार दिला. शनिवारी सकाळी शिवजयंतीनिमित्त निवृत्त जवान जगन्नाथ पाटील, करण पाटील यांनी मूर्तीला पुष्पहार घातला. जवान राकेश पाटील यांनी श्रीफळ वाढविला. रुक्मिणी निलजकर, विणा पुजारी, लक्ष्मी धामणेकर, अर्चना पाटील यांनी पाळणा म्हटला. यावेळी रवि पाटील, मंदार जाधव, बाळू पुजारी, पुजारी, ऋषीकेश पुजारी, महादेव पाटील, गणेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
एपीएमसीत शिवजयंती साजरी
कंग्राळी खुर्द: कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी आणि कर्मचारी बांधव शनिवारी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अमाप उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शिवाजी चौकात सभामंडप घालण्यात आला होता. परिसरात भगवे झेंडे, भगव्या पताका यामुळे परिसर शिवमय झाला होता. य् ाावेळी व्यापारी बसवंत मायाण्णाचे यांनी शिवमूर्तीला मालार्पण करून पूजन केले. तर एस. आर. कडूकर यांनी श्रीफळ वाढविले. यावेळी ज्येष्ठ लेखापाल रमेश सावंत, कल्लाप्पा पाटील, परशराम मेंडके यांनी पाळणा आणि शिवगीत, गणरायांची आरती गायिली. प्रेरणामंत्राने कार्यक्रमाला सुरुवात झाली. ध्येयमंत्राने सांगता झाली. यावेळी व्यापारी बाळाराम पाटील, संजय पाटील, विश्वास घोरपडे, विनायक पाटील, चेतन खांडेकर यांच्यासह व्यापारी, कर्मचारी उपस्थित होते.









