बेळगाव : बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने शिव-बसव जयंती साजरी करण्यात आली. बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रभू यतनट्टी यांनी जगज्योती बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. आमदार अनिल बेनके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले.
यावेळी ऍड. प्रभू यतनट्टी यांनी बसवेश्वरांनी दिलेली शिकवण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी घडविलेला इतिहास प्रत्येकाने अंगीकारावा. त्यामुळे समाजामध्ये निश्चितच बदल होईल, असे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष सचिन शिवण्णावर, उपाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण, आमदार अनिल बेनके यांनीही आपले विचार व्यक्त केले.
प्रारंभी जनरल सेपेटरी गिरीराज पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर शिव-बसव प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ऍड. आर. बी. पाटील, बार असो. माजी अध्यक्ष ऍड. एस. एस. किवडसण्णावर, जाईंट सेपेटरी बंटी कपाई, ऍड. सांबरेकर, ऍड. सतीश बिरादार, ऍड. बी. पी. जेवनी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.









