Shital Mhatre SIT शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या अशिर्वाद यांत्रे दरम्यानचा व्हिडीयो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यावर त्याचे पडसाद राज्याच्या विधीमंडळात पहायला मिळाले. आमदार य़ामिनी यादव यांनी हा व्हिडियो मॉर्फ केल्याचा दावा करुन या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्य़ाची मागणी केली होती. यावर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी राज्य सरकारला एसआयटीची स्थापना करण्याचे निर्देश दिल्यावर गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी त्याची घोषणा केली.
दहिसर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि राज सुर्वे मॉर्फ व्हिडीयो तयार करून आपली बदनामी केली जात असल्याचे सांगितले आहे. या तक्रारीनुसार विविध कलमांखाली हा गुन्हा दाखल झाला आहे. आज पोलीसांनी केलेल्या विविध कारवाईत अशोक मिश्रा, मानस कुवर, विनायक डावरे आणि रवींद्र चौधरी यांना अटक करून १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
या घटनेचे पडसाद राज्याच्या विधिमंडळात ही उमटले असून भाजप आणि शिंदे गटातील काही आमदारांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्याची मागणी केली होती. यामदध्ये प्रामुख्याने आमदार य़ामिनी यादव यांनी यासाठी आग्रही भुमिका घेतली. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी यासंदर्भात भाष्य करून राज्य सरकारला तत्काळ या प्रकरणाच्या चौकशी साठी एसआयटीची स्थापना करण्याचे निर्देश दिले.
यावेळी बोलताना मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, “याप्रकरणी सायबर पोलिसांचे ६ पथक काम करत असून या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वात एसआयटी स्थापन करुनच तपास केला जाईल” असे जाहीर केले.