सावंतवाडी प्रतिनिधी
आजच्या बदलत्या हवामानात आणि एकंदरीत वातावरण पाहता शेतकऱ्यांनी सजग राहणे आवश्यक आहे. भात पिकावरील कीड रोगाबाबत जैविक शेतीच्या कडे लक्ष देणे गरजेचे आहे. याबाबत योग्य व्यवस्थापन आणि योग्य नियोजन केले आणि औषधांच्या मात्रा योग्य पद्धतीने केल्या गेल्या तर निश्चितपणे आपण कीड रोगापासून संरक्षण मिळवू शकतो. शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना औषधांचा पुरवठा केला जात आहे. असे कृषी विस्तार अधिकारी एकनाथ सावंत यांनी स्पष्ट केले. शिरशिंगे येथे सावंतवाडी पंचायत समिती व तालुका कृषी कार्यालय व शिरशिंगे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक एक येथे कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ गोरे, विस्तार अधिकारी एकनाथ सावंत, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, विस्तार अधिकारी संजय शेळके, सरपंच दीपक राऊळ, उपसरपंच सचिन धोंड, माजी जि. प सदस्य पंढरी राऊळ , शिवसेनेचे पंढरी राऊळ, पांडुरंग राऊळ, कृषी अधिकारी शारदा नाडेकर,गुंडू सावंत ,कृषी मंडल अधिकारी युवराज भुईवर, वनिता मेस्त्री ,अभय राऊळ ,लक्ष्मण निगुडकर, संगीता सोनटक्के, लक्ष्मण राऊळ, ज्ञानदेव राऊळ, महादेव राऊळ ,लक्ष्मी राऊळ ,सुषमा परब ,वनिता परब ,बाळकृष्ण पेडणेकर ,स्वप्नील तारी ,गणू राऊळ ,अक्षय खराडे ,यशवंत सावंत ,सुरेश शिर्के, रिया सांगेलकर, नीता सावंत आदी उपस्थित होते.









