वार्ताहर /नंदगड
गोधोळी येथे नुकत्याच झालेल्या लोंढा विभागीय क्रीडास्पर्धेत सरकारी हायस्कूल शिरोली येथील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यानी घवघवीत यश मिळविले.
यामध्ये मुलींच्या 100 मीटर धावणेत सुनीता देसाई द्वितीय, 800 मी. मध्ये नितेश गावडा द्वितीय, 3000 मीटरमध्ये पुन्नाप्पा घाडी द्वितीय, थाळी फेकमध्ये सुदेश गुरव प्रथम, भालाफेक रोहन देसाई प्रथम, विठ्ठल गावकर, महादेव मेंडिलकर, प्रशांत गुरव चेसमध्ये प्रथम, 400 मी. रिले, थ्रो बॉल, व्हॉलीबॉल, फुटबॉलमध्ये प्रथम, मुलींच्या 800 मी. धावणेत दर्शना घाडी द्वितीय, 3000 मी. सुषमा हणबर तृतीय, हर्डल्समध्ये मयुरी पाटील प्रथम, चेसमध्ये अंजना डिगेकर, अश्विनी गावकर, बाळाताई मेंडीलकर प्रथम, थ्रो बॉल प्रथम, कबड्डी, व्हॉलीबॉल, रिलेमध्ये द्वितीय क्रमांक मिळविले. या सर्व यशवी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक, शारीरिक शिक्षक व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.









