कसबा बीड
शिरोली दुमाला ता. करवीर येथे इंडियन फारमर्स फर्टीलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड(इफको) व रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघ मर्या., पाडळी खुर्द यांच्या संयुक्त विद्यमानाने “नॅनो खते प्रात्यक्षिक प्लॉट वरती “प्रक्षेत्र दिवस व शेतकरी मेळावा” पार पडला.
याप्रसंगी गोकुळचे जेष्ठ संचालक व इफकोचे आमसभा सदस्य मा.श्री. विश्वासराव पाटील यांच्या शिरोली दुमाला येथील सोयाबीन प्रात्यक्षिक प्लॉट वरती प्रक्षेत्र दिवस व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. इफकोमार्फत संशोधन करण्यात आलेल्या नॅनो खतांचा वापर करून श्री.पाटील यांनी त्यांच्या सोयाबीन पिकाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला आहे.
सुरुवातीला सोयाबीन पेरणीच्या वेळी नॅनो डीएपी ची बीज प्रक्रिया व पिक पेरल्यानंतर एका महिन्यानंतर नॅनो युरिया व नॅनो डीएपी ची फवारणी करून त्यांनी रासायनिक खताच्या वापराला फाटा देऊन कोणतेही रासायनिक खत न वापरता सोयाबीनचे पीक अतिशय चांगल्या रीतीने घेतले आहे ही विशेष बाब. नॅनो खते ही पर्यावरण पूरक आहेत तसेच नॅनो खतांच्या वापरामुळे उत्पादनामध्ये वाढ मिळते तसेच पिकाची गुणवत्ता ही सुधारते हे या प्रात्यक्षिकांवरून पाहायला मिळाले.
या वेळी बोलताना श्री विश्वास पाटील म्हणाले की नॅनो खते ही नवीन युगाची नवीन तंत्रज्ञानावर आधारित व रासायनिक खताला एक सक्षम पर्याय म्हणून शोधली गेलेली खते आहेत व ही नॅनो खते वापरासाठी अतिशय सोपी आणि, नवीन तंत्रज्ञानावर आधारित व रासायनिक साठवणीसाठी अतिशय सोयीची आहेत. आणि म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नॅनो खतांचा वापर करून आपल्या जमीन,पाणी व हवा यांचे आरोग्य अबाधित ठेवत पिकाची उत्पादकता व गुणवत्ता वाढवण्यावर भर द्यावा . उत्पादन खर्च कमी करा. पिक उत्पादनासाठी फायदेशीर आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल अस्या ,अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन केले .
या कार्यक्रमादरम्यान इफको चे कोल्हापूर जिल्ह्याचे क्षेत्र अधिकारी श्री.विजय बुनगे सर यांनी नॅनो यूरिया,नॅनो डीएपी,सागरिका व इफकोचे इतर प्रॉडक्ट विषयी मार्गदर्शन केले. मा.श्री. सचिन पाटील चेअरमन रयत संघ, यांनी सोयाबीन प्रात्यक्षिक प्लॉट वरती घेण्यात आलेल्या ट्रीटमेंट विषयी सर्वांना माहिती दिली.
या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र शासना मार्फत घेण्यात आलेल्या तृणधान्य पीक स्पर्धेत सहभाग घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले यानंतर यावेळी.यानंतर सर्व शेतकरी बंधू-भगिनींनी सोयाबीनच्या प्लॉट वरती जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली केली. या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक रयत संघाचे चेअरमन सचिन विश्वासराव पाटील यांनी केले आभार इफको कंपनीचे श्री श्री विजय बुणगे यांनी मांडले .या कार्यक्रमा वेळी आयोजका मार्फत सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला गोकुळचे संचालक, इफको आमसभा सदस्य विश्वास पाटील, रयत संघाचे चेअरमन सचिन विश्वासराव पाटील, शिवाजी देसाई, नेमगोंड पाटील, शिरोलीचे माजी सरपंच एस के पाटील, राहुल पाटील, अशोक पाटील , रयतचे मॅनेजर तानाजी निगडे, कृषी अधिकारी पल्लवी पाटील मॅडम, अरविंद देसाई, चंद्रकांत घाटगे, शामराव देसाई, शिवाजी परीट तसेच पंचक्रोशीतील बचत गटाच्या महिला व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.









