कसबा बीड वार्ताहर
शिरोली दुमाला तालुका करवीर येथे ग्रामपंचायत निवडणूकसाठी रविवारी मतदान होऊन आज सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी संकाळी निकाल जाहीर झाला. या निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी जनसेवा ग्रामविकास आघाडीचे नेते गोकुळचे माजी अध्यक्ष व संचालक विश्वासराव पाटील व किशोर पाटील यांच्या आघाडीविरुद्ध लोकशाही ग्रामविकास आघाडी तुळशी समूहाचे सरदार शिवाजीराव पाटील व गजानन सुभेदार आणि इतर यांच्यात ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये सचिन विश्वासराव पाटील यांनी 2033 मते पडली. तर सरदार शिवाजीराव पाटील यांना 1469 मते मिळाली. सचिन विश्वासराव पाटील हे 564 च्या लीडने विजयी झाल्याने त्यांची लोकनियुक्त सरपंच म्हणून झाली. त्यांच्या निवडीचे पत्र निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना प्रदान केले.
सुरुवातीपासूनच पॅनेल बांधणी पासून ते निवडणुकीपर्यंत दोन्ही आघाडीत चुरशीने प्रचार यंत्रणा राबवण्यात आली. त्यामुळे गावच्या निवडणूकीत तब्बल 87. 25% मतदान झाले. आज समोर आलेल्या निकालात जनसेवा ग्रामविकास आघाडीतील 7, तर लोकशाही ग्रामविकास आघाडीचे 5 उमेदवार विजयी झाले. तसेच अपक्ष म्हणून निता रणजित पाटील या निवडूण आल्या. तर सोनाबाई बाबू कांबळे या अगोदरच बिनविरोध निवडून आल्या होत्या.
शिरोली दुमाला येथील विजयी झालेले उमेदवार प्रभागानुसार खालील प्रमाणे
प्रभाग क्रमांक 1. मधून शिवाजी धोंडीराम कांबळे, गौतमी रणजीत कांबळे, कविता भीमराव पाटील- कराळे
प्रभाग क्रमांक 2. अरुण आनंदा पाटील, वैशाली धनाजी परीट, गायत्री गजानन सुभेदार .
प्रभाग क्रमांक 3 . सुशांत सर्जेराव पाटील, सोनाबाई बाबू कांबळे.
प्रभाग क्रमांक 4 . कृष्णात आनंदा पाटील, कल्पना दीपक कांबळे.
प्रभाग क्रमांक 5. सागर वसंत घोटणे, सुरज नारायण पाटील, नीता रणजीत पाटील