शिरोळ प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गतवर्षी झालेल्या आंदोलनात २०२२-२३ या हंगामातील गाळप झालेल्या ऊस उत्पादक शेतक-यांना प्रतिटन १०० रूपयाचा दुसरा हप्ता देण्याबाबत शासनाने मध्यस्थी करून तोडगा काढला होता.
सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील बहुसंख्य साखर कारखानदारांनी मागील शंभर रुपये देण्याचे तयारी दर्शवून तसे लेखी प्रस्ताव दिले असताना शासनाने त्यास मान्यता का दिली नाही. तातडीने मान्यता देण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री नाम अमित शहा यांचा बुधवारी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिरोळ पोलिसांनी शिरोळ, नांदणी, हरोली येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आठ कार्यकर्त्यांच्या ताब्यात घेऊन रात्री सोडून देण्यात आले. शिरोळ पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना नोटीसा लागू केल्या होत्या.








