शिराळा प्रतिनिधी
शिराळा बायपास बाह्य वळण चौक बनलाय मृत्यूचा सापळा. आयटीआय ते कोकरुड या पंधरा ते वीस किलोमीटर मध्येच अनेकांचे बळी गेले आहेत.तर बाह्यवळण रस्त्यावर चार, दोन दिवसामध्ये लहान मोठा एकतरी अपघात हे ठरलेले गणित बनले आहे. या बायपास रोडवर भर चौकात उभारण्यात येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्समुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून या ट्रॅव्हल्स चौकातून हटवण्याची मागणी वारंवार केली जात आहे. तर अपघातांची सर्वाधिक नोंद याच बायपास रोडवर झाली आहे.
आयटीआय बाह्यवळण चौकात उभ्या असणाऱ्या ट्रॅव्हल्समुळे जीव घेणी गर्दी होतं आहे. सायंकाळच्या सुमारास वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होते. शिराळा पोलीस ठाण्याचे अधिकार्यांचे दुर्लक्ष असल्याने अपघातांचे प्रमाण या चौकात लक्षणीय वाढले आहे. अनेक वर्षांपासून सर्वसामान्य जनता या चौकातून ट्रॅव्हल्स हटवण्याची मागणी वारंवार करत आहेत. परंतु पोलिस प्रशासनाने डोळ्यावर गांधारीची पट्टी बांधली आहे की काय ? असा प्रश्न पडला आहे.
शिराळा बायपास रोडवरील मेन चौकात ट्रॅव्हल्स उभ्या राहत असल्यामुळे अनेक व्यवसायिकांनी रस्त्याकडेलाच अतिक्रमण करत आपले व्यवसाय मोठ्या प्रमाणात थाटले आहेत. तर चार नंतर मुंबईला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स एकाच वेळी येत असल्याने सर्व व्यवसायिक व त्यांचे कामगार व व्यावसायिक पाण्याच्या बाटल्या, वडापाव, पाणपट्टी साहित्य घेऊन सैरभैर गाडी मागे पळत सुटतात. त्यामुळे अनेकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. तर आसपासच्या गावांतून कराड, सातारा, पुणे, मुंबईचे प्रवासी या ट्रॅक्टर साठी ऊभे असतात. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सदर चौकातून वळणं घेऊन कोकरुड, शेडगेवाडी, मांगले मार्गे कोल्हापूर, सागाव, सरूड, बांबवडे, चांदोली जाण्यासाठी हा एकमेव बायपास रोड आहे. याचा अंदाज या ठिकाणच्या बाह्य वळणाचा लागत








