कुडाळ-प्रतिनिधी
मागील वर्षी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस ) परीक्षेत कुडाळ तालुक्यातील लक्ष्मी नारायण विद्यालयाने यश संपादन केले. या विद्यालयाच्या वरद संदेश प्रभू व चंदन अंकुश गरुड या दोन विद्यार्थ्यांनी गुणवत्तायादीत स्थान मिळवून शिष्यव़त्ती पटकावली.
या यशाने विद्यालयाचा लौकीक उंचावला आहे. वरद व चंदन याना गणित विषयाचे शिक्षक आत्माराम सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्द्ल संस्थेचे अध्यक्ष राजाराम सावंत, सचिव प्रकाश कुबल, खजिनदार भरत सामंत व सर्व संचालक , पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी – सदस्य तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापिका सौ. स्नेहा परब , शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.









