Nana Patole : देशाचे सरन्यायाधीश यू. यू. लळीत हे राज्य सरकारच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत एकत्र व्यासपीठावर उपस्थित असल्यामुळे त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना सरन्यायाधीशांनी या प्रकरणातील एका पक्षासोबत कार्यक्रमात हजेरी लावणं चुकीचं असल्याचं मत व्यक्त होत आहे. नाना पटोलेंनी त्यावरून सरकारला लक्ष्य केलं आहे. तसेच दादरमधील शिंदे- ठाकरे राडा यावर देखील पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“राज्यकर्त्यांनी संविधानाच्या आधारावरच काम करावं असं अपेक्षित आहे. पण आज महाराष्ट्रात असंवैधानिक सरकार आहे. अशावेळी सरन्यायाधीश मुख्यमंत्र्यांना कसं भेटतात? सरकारवरच आक्षेप आहे आणि त्यांच्या कोर्टात न्याय चालू आहे.त्यामुळे लोकशाहीत जनतेनं कुणाकडे बघावं? असा प्रश्न पडला आहे. संविधान व्यवस्था, न्यायव्यवस्था धोक्यात आली आहे”, अस मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे.
दादरमधील राड्या संदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, “महाराष्ट्रात तमाशा करण्याचं काम सुरू आहे. गुवाहाटी आणि त्यानंतरच्या प्रकारामुळे महाराष्ट्राची राजकीय बदनामी देशात झाली. दिवसाढवळ्या गोळीबार, मुलींचे अपहऱण या गोष्टी महाराष्ट्रात होत आहेत. अजूनही पालकमंत्र्यांची नियुक्ती नाही. राज्यात निर्माण झालेला हा गोंधळ लोकशाहीला घातक असल्याचे पटोले म्हणाले.
Previous Article5 ते 18 वयोगटासाठी लवकरच नाकावाटे कोरोना लस
Next Article सावंतवाडी शहरात पावसाची संततधार








