ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या समर्थक आमदारांसह आज गुवाहाटी दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. दरम्यान, काही आमदार आणि मंत्री या दौऱ्यात सहभागी झाले नाहीत. त्यामुळे शिंदे गटातील आमदार आणि मंत्री नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई विमानतळावरुन आज सकाळी 10 वाजता विशेष विमानाने शिंदे गटाचे आमदार आणि खासदार गुवाहाटीला रवाना झाले. या विमानात एकूण 180 जण आहेत. हे सर्वजण दुपारी12 वाजेपर्यंत गुवाहाटीत पोहचतील. त्यानंतर ते देवीचं दर्शन घेतील. कामाख्या देवीच्या मंदिरात ते विशेष पुजा करणार आहेत. त्यानंतर हा गट आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांचीही भेट घेणार आहे. सत्तांतर नाटय़ावेळी प्रसिद्ध झालेल्या ‘रेडिसन ब्लू’ हॉटेलमध्ये ते मुक्काम करणार आहेत. उद्या संध्याकाळी हा गट पुन्हा महाराष्ट्रात परतणार आहे.
अधिक वाचा : एक इंचही जागा कर्नाटकडे जाता कामा नये; अजित पवारांनी ठणकावले
दरम्यान, काही आमदार नाराज असल्याने हा दौरा करत नसल्याची चर्चा आहे. मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री तानाजी सावंत, आमदार सुहास कांदे, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, लता सोनवणे आणि उदय सामंत शिंदे हे या दौऱ्यात सहभागी झाले नसल्याची माहिती आहे.