महाराष्ट्रात शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी करत युती सरकार स्थापन केल. सुरवातीला आमदार त्यानंतर खासदार आणि नगरसेवक शिंदे गटात सामील होत आहेत. यामुळे सेनेला मोठा धक्का बसला आहे. मात्र अजूनही कट्टर शिवसैनिक हे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठिशी ठाम उभे आहेत. प्रत्येक मतदार संघात शिवसेना अबाधित रहावी यासाठी आदित्य ठाकरे राज्यभर शिवसंवाद यात्रा करत आहेत. काल कोकण, कोल्हापूर दौरा केल्यानंतर आज ते पुण्यात शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान ते पुण्याला दौऱ्यासाठी जाण्यापूर्वीच शिंदे गटातील आमदार तानाजी सावंतांनी आदित्य ठाकरेंवर घणाघात केला.
तानाजी सावंत निशाणा साधताना म्हणाले, आदित्य ठाकरे हे शक्तीप्रर्दशन करत नसून शक्तीपात करत आहेत. शिवसेना म्हणून कोणीही सेनेत राहिले नाही. हा त्यांचा शेवटचा प्रयत्न आहे. आदित्य ठाकरेंकडे फक्त एक आमदार आहे, त्यांचं कर्तुत्व काय? कोण आहेत आदित्य ठाकरें? आम्ही त्यांना फार महत्त्व देत नाही.आम्ही सगळेजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देणार आहोत अशी टिका त्यांनी केली.
दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही पुण्याला जाणार आहेत. यावेळी ठाकरे आणि शिंदे आमने-सामने येण्याची शक्यता आहे. बंडखोरांना परत यायचे असेल तर आमचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले आहेत असे आव्हान काल कोल्हापुरात बोलताना आदित्य ठाकरेंनी केले. त्याच्या या वक्तव्याला मुख्यमंत्री काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








