Maharashtra Politics News : सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु झाली आहे. सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय देणार याकडं सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. भारताची लोकशाही सदृढ कशी होईल यासाठीची लढाई होईल. शिंदे गट-भाजपनं विजय गृहीत धरला आहे.यामुळेच सर्वोच्च संस्थांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाला आहे, अस मत अनिल देसाई यांनी व्यक्त केलं आहे. तर आम्हाला खात्री आहे आम्ही जी मागणी केली आहे त्यानुसार सकारात्मक निर्णय होईल. प्रत्येकाला मागणी करण्याचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयात जो निर्णय आहे तो सर्वांना मान्य कराव लागेल, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे
नेमके प्रकरण काय आहे
मागील वर्षी जून 2022 ला हे प्रकरण कोर्टात आलं.
सत्तासंघर्षाचं प्रकरण सध्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर आहे.
हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे देण्याची ठाकरे गटाची मागणी आहे.
अपात्रतेच्या मुद्यावरून प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे देण्याची ठाकरे गटाची मागणी आहे.
अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना पीठासीन अधिकारी अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतात की नाही
अरूणाचलमधील नबाम रेबिया प्रकरणाचा दाखला देत असा निर्णय घेऊ शकत नसल्याचा कोर्टाचा निकाल
महाराष्ट्र, अरूणाचल प्रदेश दोन्ही प्रकरणांचे संदर्भ वेगळे असल्य़ाचा ठाकरे गटाचा दावा आहे.
त्यामुळेच या प्रकरणाचा फेरविचार करावा अशी ठाकरे गटाची मागणी आहे.
प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे गेल्य़ास फेरविचार करण्यास कोर्ट तयार होईल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








