Maharashtra Monsoon Assembly Session Live: राज्यात युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांनी आक्रमकता दाखवत यंदा प्रत्येक गोष्ट ही वेळाने होणार असे ताशेरे सत्ताधाऱ्यांवर ओढायला सुरुवात केली आहे. त्यातच पावसाने झालेले शेतकऱ्यांचे नुकसान, ओल्या दुष्काळाची मागणी अशा मुद्यांनी यंदाचं अधिवेशन गाजणार आहे. कालच चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाने टाकलेला बहिष्कार, मोहित कंबोज यांनी केलेलं आजचं ट्विट यामुळे यंदाच अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता नाकारचा येत नाही. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच राज्यसरकार विरोधात विरोधीपक्ष आक्रमक झाला आहे.
अधिवेशनाला सुरुवात करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सभागृहात प्रवेश केला. मुख्यमंत्री समोर येताच विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या मुद्यावरून महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. ‘गद्दार सरकार हाय, हाय’, ईडी सरकार हाय, हाय अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली.
सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
Previous Articleस्मार्ट सिटी अग्रगण्य; पादचारी मात्र नगण्य!
Next Article रेसकोर्स परिसरातील शाळा गजबजल्या









