सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी शिंदे- फडणवीस सरकारच्या वकिलांना काही प्रश्न विचारल्यानंतर सरन्यायाधीश सोशल मीडियावर ट्रोलींगचा सामना करावा लागला. यांदर्भात राष्ट्रपतींकडे काँग्रेसच्या नेत्यांनी तक्रार केल्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर आता कोणाचा विश्वास राहिलेला नसून राज्यात ट्रोलिंगसाठी भाड्याची माणसे सत्ताधाऱ्यांकडून बसवली गेली असल्याचे म्हटले आहे. तसेच मंत्रालयात लगबग सुरू असून जुन्या फाईल्स पटापट काढल्या जात आहेत. यावरुन त्यांना शिंदे- फडणवीस सरकारला कशाचीतरी चाहूल लागल्याचे म्हटले आहे.
विधान भवनाबाहेर माध्यमांशी बोलताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नान पटोले म्हणाले, “सध्या मंत्रालयातल्या परिस्थितीबद्दल आमच्या लोकांकडून जे ऐकलं आहे त्यावरून काहीतरी गडबड आहे. मंत्रालयात एकप्रकारची लगबग सुरु आहे. सत्ताधाऱ्यांना कशाची तरी चाहूल लागली आहे. सरकर जेव्हा जातं तेव्हा अशी गडबड पहायला मिळते. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत मी काही बोलणार नाही. आम्ही न्यायालयाच्या निकालाची वाट वाहत असून आमचा प्लॅन ए आणि बी दोन्ही तयार आहेत.” असे सुचक वक्तव्य त्यांनी केले.