ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाविकास आघाडीच्या (maha vikas aghadi) काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे- फडणवीस सरकारला (shinde fadnavis government) आहे. त्यामुळे राज्यात गोर गरीबांना देण्यात येणारी शिवभोजन थाळी बंद होण्याची शक्यता आहे. ही योजना बंद झाल्यास गरजूंना मोठा फटका बसणार आहे. राज्यातील जनतेला या योजनेतंर्गत १० रुपयांत जेवण तर कोरोना काळात ५ रुपयात जेवण मिळत होते.
मविआ सरकारच्या काळात मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवभोजन थाळी (shiv bhojan thali) सुरु केली होती. या योजनेतून दर दिवशी १ लाख ८८ हजार ४६३ थाळ्यांची विक्री होते. यासाठी राज्यात विविध ठिकाणी केंद्र सुरु केली आहेत. शिवभोजन थाळी केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून मदतही केली जाते. याची संख्या 2 लाखांपर्यंत नेण्यासाठी ठाकरे सरकारने प्रस्ताव आणला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हा प्रस्ताव शिंदे सरकारसमोर आला. मात्र, त्यावर शिंदे सरकारने यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, आता ही शिवभोजन थाळी सुरु ठेवायची की बंद करायची याबाबत आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : जॅकलीन फर्नांडिसला मोठा दिलासा! २०० कोटींच्या घोटाळाप्रकरणी अंतरिम जामीन मंजूर
काय आहे शिवभोजन थाळी…
गरिबांना, गरजूंनाा सहज व अत्यल्प दरात भोजन उपलब्ध करण्यासाठी राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले होते. शिवभोजन थाळी केंद्र स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, हॉटेल चालक आदींना चालवण्यासाठी देण्यात आली आहेत. शिवभोजन थाळी केंद्र चालकांना राज्य सरकारकडून अनुदान देण्यात येते. शिवभोजन थाळीत एक वाटी भाजी, दोन चपात्या, भात व वरणाचा समावेश आहे.
राज्य सरकारकडून शिवभोजन केंद्र चालकांना अनुदान दिले जात होते. ग्रामीण भागातील केंद्रचालकांना एका थाळीमागे ५० रुपये आणि शहरी भागातील थाळी चालकांना ३५ रुपये अनुदान देण्यात येत होते