ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिंदे-फडणवीस सरकारचं ‘डेथ वॉरंट’ निघालं आहे. येत्या 15 दिवसांत हे सरकार कोसळेल, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
शिंदे गटासह भाजपला शह देण्यासाठी उध्दव ठाकरेंनी राज्यभर सभांचा धडाका लावला आहे. खेड, मालेगावनंतर आता जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे त्यांची सभा होत आहे. मात्र, या सभेआधीच संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारविषयी मोठं विधान केलं आहे. राऊत म्हणाल, प्रत्येकजण आपापली गणितं मांडत आहेत. आम्ही मात्र निकालाची वाट पाहतोय. सध्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या 40 लोकांचं जे काही राज्य आहे, ते पुढील 15 ते 20 दिवसांत गडगडल्या शिवाय राहणार नाही.
अधिक वाचा : पुणे लोकसभा निवडणूक लढण्यास तयार; मा. आमदार मेधा कुलकर्णी यांची इच्छा
फेब्रुवारीपर्यंत सरकार पडेल, असं मी मागे एकदा म्हणालो होतो. पण न्यायालयाचा निकालच उशिरा लागत आहे. पण हे सरकार टिकत नाही, या सरकारचं ‘डेथ वॉरंट’ निघालेलं आहे. येत्या 15 ते 20 दिवसात सरकार कोसळणार कोसळेल.








