शिमगोत्सव मिरवणुकीला हजारोंची उपस्थिती : ढोलताशांची पथके ठरली विशेष आकर्षण
प्रतिनिधी / वाळपई
पुणे-महाराष्ट्र येथून खास व्यवस्था करण्यात आलेल्या शिवगर्जना व ऊद्र गर्जना या ढोल ताशांच्या पथकाच्या सादरीकरणामुळे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत सत्तरी तालुका शिमगोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हजारो नागरिकांची उपस्थिती आणि शिमगोत्सव समितीने नियोजनबद्ध केलेल्या कार्यक्रमांमुळे हा लोकोत्सव उत्साहपूर्ण ठरला. या लोकोत्सवात चित्ररथ, रोमटामेळ, वेशभूषा व लोकनृत्य स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला. राज्याच्या वेगवेगळ्या भागातील पथकांनी भाग घेतला. पर्यटन खात्याच्या सौजन्याने सत्तरी तालुका समिती आयोजित लोकोत्सव 2023 साठी सरकारने निर्देशित केलेल्या बक्षिसांमध्ये आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी भरघोस वाढ केल्यामुळे या उत्सवाला चांगला प्रतिसाद लाभला.
धार्मिक पूजनाने शोभायात्रेला प्रारंभ
लोकोत्सवाची सुऊवात वाळपई वनखात्याच्या सर्कलकडून करण्यात आली. यावेळी आरोग्यमंत्री तथा समितीचे अध्यक्ष विश्वजीत राणे, आमदार डॉ. देविया राणे यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून व धार्मिक पूजनाने शोभायात्रेचा प्रारंभ करण्यात आला. सत्तरी शिमगोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष सेहझीन शेख, उपाध्यक्ष नरहरी हळदणकर, उपाध्यक्ष विनोद शिंदे, उपाध्यक्ष सगुण वाडकर, उपाध्यक्ष देवयानी गावस, उपाध्यक्ष राजश्री काळे, सचिव उदय सावंत, खजिनदार प्रसाद खाडिलकर, उपखजिनदार उदयसिंग राणे, सभासद उपस्थित होते. मासोर्डे ग्रामस्थांतर्फे यावेळी सार्वजनिक गाऱ्हाणे घालण्यात आले. तद्नंतर ऊद्रगर्जना व शिवगर्जना ही ढोल ताशा पथके वाळपई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आली. समितीतर्फे मान्यवरांना बसण्यासाठी खास आसन व्यवस्था करण्यात आली होती.
लोकनृत्यांनी दिला मनमुराद आनंद

वाळपई नगरपालिकेच्या व्यासपीठावर राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. वेगवेगळ्या भागातून आलेल्या संघांनी गोव्याची पारंपरिक लोकनृत्ये सादर केली. अनेक लोककला पाहण्याची संधी शिमगोत्सवप्रेमींना प्राप्त झाली. या लोकनृत्य स्पर्धांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कलाप्रेमींची उपस्थिती होती.
रोमटामेळ स्पर्धेला उत्कृष्ट प्रतिसाद
अनेक रोमटामेळ पथकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. स्पर्धेला वाळपई येथील शहीदस्तंभ परिसरातून सुऊवात करण्यात आली. ही मिरवणूक वाळपई बाजारामध्ये आल्यानंतर श्री हनुमान मंदिर प्रांगणात तिचे विसर्जन करण्यात आले. सूत्रबद्ध ताल, लय, गायन व संगीताच्या जोरावर थिरकरणारी पावले त्यामुळे स्पर्धेला विशेष रंगत आली.
चित्ररथ स्पर्धा ठरली आकर्षक
सत्तरी तालुक्मयात तीन वर्षांनंतर लोकोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा सत्तरी तालुक्मयातील जनतेला कलेचा उत्कृष्ट आविष्कार पाहण्याची संधी प्राप्त झाली. चित्ररथ स्पर्धेमध्ये राज्यातील अनेक पथके सहभागी झाली होती. उशीर झाला असतानासुद्धा मोठ्या उत्साहात नागरिक या चित्ररथ स्पर्धेचा आनंद घेताना दिसत होते.
समितीतर्फे उत्कृष्ट सजावट
सत्तरी शिमगोत्सव समितीतर्फे यंदा उत्कृष्ट सजावट करण्यात आली होती. व्यासपीठाची रचना आकर्षक करण्यात आली होती. यामध्ये सहभागी झालेले मान्यवर यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी नागरिकांना उपलब्ध झाली. लाईटची सुविधा चांगली करण्यात आली होती. कागदी सजावट प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होती. शिमगोत्सव समितीतर्फे गेल्या पंधरा दिवसांपासून यासाठी सूत्रबद्ध नियोजन करण्यात आले होते. यामुळे अनेकांनी समितीच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल आनंद व्यक्त केला व त्यांना धन्यवाद दिले.
जनतेच्या आनंदासाठी बक्षिसांमध्ये वाढ : राणे
समितीचे अध्यक्ष तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले की, सत्तरी तालुक्मयामध्ये तीन वर्षांनंतर हा चांगल्या प्रकारचा उत्सव साजरा होत आहे. यामध्ये प्रचंड प्रमाणात नागरिकांची उपस्थिती ही खरोखरच आनंदाची बाब आहे. सत्तरी शिमगोत्सव समिती चांगले कार्य करीत आहे. नियोजनबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम त्यांनी सांभाळलेला आहे. यामुळे समितीचे अभिनंदन करतो. अशा पारंपरिक लोककलांच्या माध्यमातून आपल्या कलेचे संवर्धन होत असते. कलाकारांना चांगली संधी उपलब्ध होत असते. गोवा पर्यटन खात्याच्या सौजन्याने या लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले असले तरीसुद्धा बक्षिसांमध्ये भरघोस वाढ कऊन सत्तरी तालुक्मयातील जनतेला चांगली कला पाहण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी हा प्रयत्न करण्यात आल्याचे राणे यांनी सांगितले.
कलांचा आस्वाद घेण्याची संधी : डॉ. देविया राणे
समितीच्या कार्याध्यक्ष डॉ. देविया राणे यांनी, समितीने चांगले आयोजन करून नागरिकांना उत्कृष्ट शिमगोत्सव पाहता आला याबद्दल समितीचे आभार व्यक्त केले. सत्तरी तालुक्मयांमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ग्रामीण भागातील जनतेला कलांचा आस्वाद घेण्याची संधी या लोकोत्सव माध्यमातून उपलब्ध झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
सर्व समिती सदस्यांची उपस्थिती
शिमगोत्सव मिरवणुकीच्या सुरुवातीला समितीचे सदस्य शराफत खान, रामदास शिरोडकर, अनिल काटकर, फैजल शेख, विनोद हळदणकर, वसीउद्दीन सय्यद, सरफराज सय्यद, निर्मला साखळकर, प्रसन्ना गवस, रामू खरवत, सरिता गावकर, दीक्षा गावस, अमित शिरोडकर, गुऊदास गावस, महेश गावकर (नानेली), मकरंद वेलिंगकर, धर्मेंद्र साळुंके, प्रशांत मराठे, उमेश गुळेलकर, अब्दुल्ला खान, अंकुश धुरी, प्रेमनाथ दळवी, अनिल गावडे, देवानंद परब, नारायण गावकर, शिवाजी देसाई (सावर्डे), आत्माराम शेट्यो, नितेंद्र राणे, नितेश गावडे, नीलेश परवार, नामदेव राणे, रामचंद्र गांवकर (मोर्ले), रामनाथ डांगी, मिलिंद गाडगीळ, दिनेश तारी, किरण नार्वेकर, लक्ष्मी हरवळकर, प्रदीप गवंडळकर, सोमनाथ काळे, नरेंद्र गावकर, कृष्णा गांवकर, गोविंद कोरगावकर, ऊद्रेश मणेरकर, देविदास गावकर, तानाजी देसाई, अशोक नाईक, बी. डी. मोटे, संतोष नाईक, बिरो काळे, राजेश सावंत, विश्वनाथ गावस, अभिषेक गावकर, सपना सामंत, नरेंद्र परीट, चंद्रू सावंत, सुनील मराठे, राजाराम परवार, कांता गावस, नीलेश गावस, दिलीप नाईक, हरिश्चंद्र गावस, विश्वनाथ गावस, चंद्रकांत परब, तेजन गावस, प्रविण मणेरकर व इतर समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.









