प्रतिनिधी, रत्नागिरी
जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती देवीचा शिमगोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय नुकताच झालेल्या गावकरी, मानकरी आणि ट्रस्टीच्या बैठकीत घेण्यात आला. श्री भगवती देवीचा शिमगोत्सवाच्या कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे ठरवण्यात आली आहे.
देवीच्या अंगावर रूप लावण्याचा कार्यकम पार पडला आहे. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. देवीची निशाणकाठी उभी करण्यात आली. तर दुपारी 2 वा. लहान मुलगा देवीच्या रूपाने सजवला जातो व देवीची बेताची काठी, बैठक, अंगाऱ्याची परडी, निशाण व अबदागीरसह मानकरी, विश्वस्त, ग्रामस्थ वाजत-गाजत भगवती मंदिरातून भैरी मंदिर, जोगेश्वरी मंदिर, नवलाई-पावणाई मंदिर, पोलीस स्टेशन महापुरुषाला हात भेट घेण्यात आली व परत देवीच्या मंदिरात नेण्यात आली. जाताना वाटेवरील ग्रामस्थांकडून देवीच्या रूपाने सजवलेल्या मुलाची तसेच निशाण व अबदागीरची पुजा करण्यात आली.
येत्या 6 मार्च 2023 रोजी सोमवार दुपारी 1.30 वा. देवीच्या रूपाने सजविलेला लहान मुलगा देवीची बेताची काठी, बैठक, अंगा-याची परडी, निशाण व अबदागीरसह किल्ला गावातील मानकरी, विश्वस्त, ग्रामस्थ देवीची होळी आणण्यासाठी खालचा फगरवठार येथील श्रीनिवास दिक्षीत यांच्या घरी जाईल. होळीची पुजा करून गाऱ्हाणे घालून ती होळी तोडून भैरी मंदिर वरुन येईल. दांडा फिशरीज येथे थांबुन होळीच्या बुध्यांकडील भागाचा ताबा पेठकरांच्या ( तटबंधी बाहेरील पेठकिल्याच्या परीसरात रहाणारे ग्रामस्थ )यांच्या ताब्यात दिली जाईल. ती होळी राम मंदिर ( पेठकर म्हणजे किल्याच्या मार्गे किल्याच्या भोगद्यामध्ये येते. त्या ठिकाणी पेठकर होळीच्या बुध्यांचा ताबा परत किल्लेंकरांकडे देतात. तेथून होळी भागेष्वर मंदिर, पारावरच्या मारुती देवळाकडून ठिक 12.00 वा. देवीच्या मंदिरामध्ये येऊन होळीचा होम पेटवला जाईल.
होळी घेवून येताना वाटेत जागोजागी देवीचे रूप घेतलेल्या मुलाची व निशाण व अबदागीरीची पुजा केली जाते. 7 मार्च रोजी दुपारी 1.30 वा. देवींच्या रूपाने सजविलेला लहान मुलगा, देवीची बेताची काठी, बैठक, अंगा-याची परडी, निशाण व अबदागीरसह किल्ला गावातील मानकरी, विश्वस्त, ग्रामस्थ सर्व होमातील राख घेऊन चव्हाटा, होळ देव, खंडोबा, वेताळ, गणपती, मारुती, मुख्य मानकरी यांच्या घरातील देव, मारुती मंदिर पार, गणेश मंदिरात धुळवड उडवतात. नंतर भैरी मंदिर, गुजर व खैर यांच्या घरी नंतर झाडगांव येथील सावंत यांच्या घरी जाऊन परत मंदिरात येणे होणार आहे.
12 मार्च 2023 रविवार दुपारी 4.00 वा. चव्हाट्याजवळ मुख्य मानकरी यांच्याहस्ते बलीदानाचा कार्यक्रम होतो. त्यानंतर देवीच्या रूपाने सजवलेला लहान मुलगा, देवीची बेताची काठी, बैठक, अंगा-याची परडी, निशाण व अबदागीरसह मानकरी, विश्वस्त, ग्रामस्थ वाजतगाजत प्रथम देवीवर रंग उडवतात व नंतर चव्हाटा, होळ देव, खंडोबा, वेताळ, गणपती, मारुती, मुख्य मानकरी यांच्या घरातील देव, मारुती व गणेश मंदिरात रंग उडवतात. त्यानंतर तेथून मुख्य मानकरी यांच्या घरी देवी निशाणासह येऊन बसते व रात्री 10.00 वाजल्यानंतर आराव्यासाठी देवळात जाते. रात्री 12.00 वा. गोंधळ घातला जातो. तटबंदी भोवती वाजतगाजत एक प्रदक्षिणा घातली जाते. देवालया भोवती पाच प्रदक्षिणा घातल्या जातात. प्रदक्षिणा घालताना प्रत्येक बुरुजावर मुख्य मानकरी नारळ देतात व अंगारा उडवतात. तद्नंतर गोंधळाचा उर्वरीत कार्यक्रम होऊन, देवीची बैठक घालून मुख्य मानकरी यांच्याहस्ते मानकऱ्यांना मानाचे नारळ व देवीच्या उत्सवात काम करणाऱ्यांना प्रसादाचे नारळ दिले जातात. त्यानंतर शिमगा उत्सवाची सांगता होणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









