रत्नागिरी :
जिल्ह्यातील 19 गांवामध्ये असलेले शिमगोत्सवाचे वाद पोलिसांच्या पुढाकाराने संपुष्टात आले आहेत. त्याठिकाणी आता शिमगोत्सव साजरा होणार आह़े जिल्हाभरात सणासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी जिह्यात दाखल होत आहेत. पोलिसांकडूनही या काळात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आह़े त्यामुळे मोठ्या उत्साहात शिमगेत्सव साजरा करा, अशा शुभेच्छा जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिल्या आहेत़
गावागावातून पालखीच्या मानपानावरून, पुजेवरून ठिकठिकाणी वाद असल्याने त्याठिकाणी शिमगोत्सव साजरा करण्यात येत नव्हत़ा यासंबंधी पोलिसांनी पुढाकार घेऊन 24 पैकी 19 गांवामधील वाद मिटवल़े अनेक गावांमध्ये सण उत्सव साजरा करण्यासाठी शांतता समिती स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत़ जिह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्य राखील पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आली आह़े 2 दंगल नियंत्रण पथक, 350 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत़ तसेच मागील वर्षात ज्या गांवामध्ये वाद निर्माण झाले होत़े त्यातील संशयित आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आह़े तसेच शिमगोत्सव शांततेत पार पडावा यासाठी नोटीस पाठवण्यात आली आह़े प्रत्येक ठिकाणी पोलिसांकडून नजर ठेवण्यात येत आह़े त्यामुळे जिल्हाभरातच चोख बंदोबस्त पोलिसांकडून ठेवण्यात आल्याचे धनंजय कुलकर्णी यांनी सांगितल़े
- वाद मिटविण्यात आलेली गावे
संगमेश्वर दख्खन, निवधे, ओझरे, खुर्द, निवेखुर्द, सोनारवाडी, साडवली
राजापूर चुनाकोळवण, पाथर्डे, देवाचे गोठणे, धाऊलवल्ली
खेड चाटव
चिपळूण सावर्डे, मांडकी, जामसूद
गुहागर आबलोली
- तालुक्यातील दोघांवर तडीपारीची कारवाई
जिह्याच्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असलेल्या तालुक्यातील दोघांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आह़े स्वप्नील बाळू पाचकुडे (24, ऱा करबुडे रत्नागिरी) व सफी उल्ला समीर सोलकर (ऱा कोकणनगर रत्नागिरी) अशी दोघांची नावे आहेत़ त्यांना रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिह्यातून 2 वर्षासाठी तडीपार करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आल़े 2024 मध्ये उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून 7 तर यावर्षी आतापर्यंत 2 जणांना तडीपार केले आह़े
- जेष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर
घरातील तऊण पुऊष व महिला कामानिमित्त मुंबई, पुणे अथवा इतर शहरांमध्ये वास्तव्य करत असतात़ अशावेळी जेष्ठ नागरिक घरामध्ये एकटेच असतात़ अशा वेळी त्यांना कोणतीही अडचण आल्यास मदतीसाठी पोलिसांकडून 8390929100 हा हेल्पलाईन नंबर सुऊ करण्यात आला आह़े हा नंबर व्हॉटस्अॅपलाही उपलब्ध असणार आह़े, अशी माहिती पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी दिल़ी








