Raj Kundra In Big Boss 16: सलमान खानचा शो बिग बॉस सिझन १६ मध्ये शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा दिसणार आहे. या शोमध्ये तो आपल्या आयुष्याविषयी कदाचित मोठे खुलासे करण्याची शक्यता आहे. यासाठी त्याने मोठी तगडी फी मागितल्याचे समोर आले आहे. मात्र याबाबत राज कुंद्रा कडून काहीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच राज कुंद्रा जेलमधून बाहेर आलेल्याला आज वर्ष झालं.याबाबत त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.
एका न्यूज पोर्टलच्या रिपोर्टनुसार, बिग बॉस सिझन १६ शो विषयी राज आणि मेकर्समध्ये सध्या बातचीत सुरु आहे. राजने पूर्ण सीझनसाठी ३० करोड रुपये मागितले आहेत. यासोबतच त्याला शो मध्ये अधिक काळ ठेवण्यात यावं अशी मागणी केली आहे. त्याला जे मानधन देण्यात येईल ते NGO ला डोनेट करण्यात यावं. शो मधून मिळणारा एकही पैसा तो स्वतःसाठी ठेवणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
राज कुंद्राचं ट्विट
पॉर्न केस प्रकरणात तुरुंगातून सुटून १ वर्ष पूर्ण झाले आहे. याबबात लिहताना राज म्हणतो की, आजच्या दिवशी जेलमधून बाहेर आल्याला वर्ष झालं. हे प्रकरण माझ्यासाठी एका वाईट स्वप्नासारखं आहे, पण मला न्याय जरुर मिळेल. सत्य लवकरच समोर येईल. पण ज्यांनी या संपूर्ण प्रकरणात माझ्यासाठी प्रार्थना केली त्यांचे मी आभार मानेन,आणि ज्यांनी मला ट्रोल केलं त्यांचेही मनापासून धन्यवाद कारण त्यांनीही मला स्ट्रॉंग केलं. सोबतच त्याने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने मास्क आणि गाॅगल घातला आहे. फोटोवर लिहिलं आहे,’जर तुम्हाला पूर्ण गोष्ट माहीत नाही तर काहीही बोलू नका’.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









