वृत्तसंस्था/ शिलाँग (मेघालय)
2025 च्या फुटबॉल हंगामातील येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर सुरु झालेल्या ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धेच्या मोहिमेला शिलाँग लाजाँग एफसी संघाने विजयाने प्रारंभ केला.
इ गटातील येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात शिलाँग लाजाँगने मलेशियाच्या आर्म्ड फोर्सेस फुटबॉल संघाचा (एटीएम) 6-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. या पहिल्या सामन्यात शिलाँग लाजाँगतर्फे सना आणि पी. बुआम यांनी प्रत्येकी 2 गोल तर बदली खेळाडू लेमूराँग आणि टंगपेर यांनी प्रत्येकी 1 गोल केला. या सामन्यात एटीएम संघाला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. या स्पर्धेत सोमवारी करबी अँगलाँग मॉर्निंग स्टार एफसी आणि आयटीबीपी एफटी यांच्यातील सामना साई स्टेडीयमवर दुपारी 3 वाजता तर दुसरा सामना साऊथ युनायटेड फुटबॉल क्लब आणि इंडियन एअरफोर्स यांच्यात सायंकाळी 7 वाजता खेळविला जाणार आहे.









