निरज चोप्राची स्पर्धेतून माघार, अनिमेश कुजूरला संधी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
द. कोरियात होणाऱ्या आगामी आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी शुक्रवारी येथे 59 सदस्यांचा भारतीय अॅथलेटिक संघाची घोषणा करण्यात आली. मात्र या स्पर्धेत भारताचा दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेक धारक निरज चोप्रा अपेक्षेप्रमाणे सहभागी होऊ शकणार नाही. दरम्यान या संघात 200 मी. धावण्याच्या शर्यतीतील भारताचा अव्वल धावपटू अनिमेश कुजूरला संघात संधी देण्यात आली आहे.
कोचीमध्ये अलिकडेच झालेल्या फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत निरज चोप्राने आपला सहभाग दर्शविला नव्हता. डायमंड लीग स्पर्धेवर तसेच येत्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा आणि बेंगळूरमध्ये 24 मे रोजी होणाऱ्या निरज चोप्रा क्लासीक भालाफेक स्पर्धेसाठी निरज चोप्राने आशियाई स्पर्धेत सहभागी न होण्याचे ठरविले आहे. भुवनेश्वरमध्ये 2017 साली झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत निरज चोप्राने सुवर्णपदक मिळविले होते. बँकॉकमध्ये यापूर्वी झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने पदक तक्त्यात तिसरे स्थान मिळविताना 6 सुवर्ण, 12 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण 27 पदकांची कमाई केली होती. बँकॉकमधील स्पर्धेत जपानने पहिले तर चीनने दुसरे स्थान मिळविले होते.
आशियाई स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय अॅथलेटिक्स संघामध्ये पुरुष विभागात अनिमेश कुजूर, अनुकुमार, कृष्ण्न कुमार, युनुस शहा, अविनाश साबळे, गुलवीर सिंग, अभिषेक पाल, सावन बरवाल, प्रवीण चित्रावेल, अब्दुल्ला अबुबाकर, सर्व्हेश कुशारे, सचिन यादव, यसवीर सिंग, समरदीप सिंग, तेजस्वीन शंकर, एस. सेबेस्टीयन, अमित, प्रणव गुरव, अनिमेश कुजूर, मणिकांता होबलीदार, अमलान बोरगोहेन, एस. तमिलारेसु, रगुलकुमार, गुरविंदर सिंग, टी.के. विशाल, जयकुमार, मनु, आर. जोसेफ, तुषार मन्ना, संतोषकुमार, धर्मवीर चौधरी, मोहीतकुमार,
महिला: नित्या गंधे, रुपल चौधरी, वित्या रामराज, ट्विकल चौधरी, पूजा, लीली दास, पारुल चौधरी, अंकिता, संजीवनी जाधव, सीमा, ज्योती येराजी, आर. अनु, शैली सिंग, अॅन्सी सोजन, सीमा, अनुराणी, ए. नंदिनी, अभिनया राजारंजन, एस. स्नेहा, एस. नंदा, दानेश्वरी, सुदीप शहा, सुभा व्यंकटेशन, जे. मॅथ्यु, कुंजा रजिता आणि एस. साबु.









